हार्दिक पांड्याचे नाव बिग बॉसमधून प्रसिद्धी झालेली अभिनेत्री एली अवराम सोबत जोडले गेले आहे. या अफेयरच्या चर्चांना क्रुणालच्या लग्नापासून उधाण आले आहे. एली अवराम मुंबईत झालेल्या लग्नात दिसली. लग्नात ती पांड्याच्या कुटुंबियांसोबत चांगलीच रमली होती. तिने बराच वेळ लग्नात घालवला.
काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्रा आणि हार्दिक पांड्याच्या चर्चांना उधाण आले होते. परिणीतीच्या ट्वीटला खास शैलीत उत्तर दिल्याने या चर्चांना सुरूवात झाली होती. परिणीती पूर्वी हार्दिक चे नाव एका मॉडलशी जोडले गेले होते. मात्र त्या मॉडलने हार्दिक आपला मित्र असल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews